ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दुबईत भीषण बस अपघात- आठ भारतीयांचा मृत्यू

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 07, 2019 12:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दुबईत भीषण बस अपघात- आठ भारतीयांचा मृत्यू

शहर : विदेश

दुबईत झालेल्या भीषण बस अपघातामध्ये आठ भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. स्थानिक यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील शेख मोहम्मद बिन झायेद महामार्गावर गुरुवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात घडला.

बसमधील अनेक प्रवाशी ईद साजरी करण्यासाठी ओमानमध्ये गेले होते. तेथून परतत असताना रशिदिया एक्झिटजवळच्या मेट्रो स्टेशनजवळ ही बस जोरात सिग्नलवर धडकली.  बसमध्ये एकूण ३१ प्रवासी होती. यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. तर उर्वरित जखमींवर रशिदिया रुग्णालयात उपचार सुरु होते. यापैकी चार भारतीयांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सर्व मृतांची ओळख पटली आहेत, राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.

या घटनेनंतर दुबईतील भारतीय दुतावास सातत्याने अपघातग्रस्त बसमधील भारतीयांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. त्यांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

मागे

बाळास जन्म देऊन आई फरार
बाळास जन्म देऊन आई फरार

सोमवारी रात्री ८ वाजता पांढरकवडा आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८८२४) यवतमाळकरि....

अधिक वाचा

पुढे  

भांडुपमधल्या स्थानिक क्रिकेटरची हत्या
भांडुपमधल्या स्थानिक क्रिकेटरची हत्या

राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचे प्रशिक....

Read more