By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 07:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नवी मुंबई – परिमंडळ उपायुक्तांच्या विशेष पथकाने वाशीतून 89 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकला अटक केली असून तो गोवंडीचा राहणारा आहे. तसेच तो नवी मुंबई परिसरातील छोट्या गांजा विक्रेत्यांना तो पुरवठा करत असल्याचे चित्र आढळून आले आहे. वाशी गाव परिसरातील एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त पंकज दहाणो, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्या पथकाने रविवारी सापळा रचला होता.
दरम्यान, यावेळी आरोपीला अटक केले असून मोहम्मद इम्रान सादिक अली शहा (23) हे आरोपीचे मव आहे. त्याच्या अंग झडतीमध्ये एक किलो गांजा आढळून आला. यानुसार पोलिसांनी चौकशी करत त्या ठिकाणी छापा टाकून 88 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानुसार सुमारे 1 लाख 76 हजार 250 रुपये किमतीचा 89 किलो 259 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपासणी करत आहेत.
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उ....
अधिक वाचा