ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवी मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 18, 2020 08:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नवी मुंबईत क्वारंटाईन सेंटरमध्ये ४० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

शहर : navi Mumbai

नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. क्वारंटाईन सेंटरमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे पुढे आले आहे. पनवेल पोलिसांच्या  माहितीनुसार नवी मुंबईतील क्वारंटाईन केंद्रावर एका डॉक्टरने ४० वर्षीय महिलेवर बलात्कार केला आहे.ही पीडीत महिलेलाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

पनवेल पोलिसांनी पीडित महिलेच्या निवेदनाच्या आधारे आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६ आणि३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.ही  गुरुवारीची लैंगिक अत्याचाची घटना आहे आणि आरोपी डॉक्टर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी डॉक्टरने त्या महिलेला काही त्रास होत आहे का, असे विचारले. त्यावेळी महिलेने सांगितले की, शरीर दुखत आहे. यावर आरोपी डॉक्टर म्हणाला की मालिश करावी लागेल. त्यानंतर आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित महिला आणि आरोपी दोघेही कोविड-१९ संक्रमित आहेत. दोघांवर क्वारंटाईन केंद्रावर उपचार सुरु आहेत. लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर कोरोना संसर्गाचा बळी आहे. या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पोलिसांनी सांगितले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार म्हणालेआरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याची कोविड-१९ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

                    

मागे

रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट
रुग्णालयाची ऑफर; २५०० रुपयांमध्ये मिळवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ....

अधिक वाचा

पुढे  

भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू
भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू

गुंडांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले गाझियाबादमधील पत्रकार विक्रम जोशी....

Read more