By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पती कोमामध्ये असल्याने एका डॉक्टर महिलेने संपत्तीच्या पालकत्वासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. कारण, कायदेशीर वारसदार संपत्तीचा पालक होण्याच्या अटींमध्ये शारीरिक असमर्थता किंवा कोमासदृश परिस्थितीचा समावेश नसल्याने या महिलेला नाईलाजास्तव कोर्टात धाव घ्यावी लागली आहे.
डॉ. लीना शर्मा (नाव बदललेले) या आपले डॉक्टर पती आणि दोन मुलांसह दहिसरमध्ये राहत आहेत. 2013 मध्ये त्यांच्या पतीला ब्रेन हॅमरेज झाला आणि ते कोमात गेले. त्यानंतर त्यांचे वैयक्तिक आणि वैद्यकीय खर्च उचलण्यासाठी लीना यांना पैशांची चणचण भासू लागली. त्यामुळे पतीच्या नावे असलेल्या मालमत्तेतील काही भाग विकणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उभा राहिला. पण, पती कोमामध्ये असल्याने त्यांनी पतीच्या संपत्तीची पालक म्हणून राहण्याचे ठरवले. सद्यस्थितीत काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अशाप्रकारे मालमत्तेच पालकत्व देता येत. त्यात फक्त मृत्यू, संपत्तीधारकाचे अल्प वय तसेच मानसिक आजार याच कारणांसाठी पालकत्वाचा नियम लागू होतो. दुर्दैवाने कोमा किंवा तत्सम परिस्थितीचा समावेश यामध्ये नसल्याने लीना यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
एका ब्रिटीश महिलेला पूर्वाश्रमीच्या नवर्याच्या बायकोला घोडी बोलणं चांग....
अधिक वाचा