ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मेट्रोच्या क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून कामगार ठार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 04:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मेट्रोच्या क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून कामगार ठार

शहर : पुणे

        पुणे - बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकाजवळ मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनने उचलेली प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश बेसाहू श्याम (वय २३, रा. नागपूर चाळ, येरवडा, मूळ- मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामागाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रामचंद्र भोसले (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार क्रेन चालक जितेंद्र उमा प्रजापती (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मेट्रोचे वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे. बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकात देखील मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी रस्त्यावर दिवसा गर्दी असते. त्यामुळे रात्रपाळीत देखील काम केले जाते. सोमवारी पहाटे क्रेमच्या सहाय्याने काम सुरू होते. त्यावेळी क्रेनच्या चालकाने क्रेन हायगयीने चालवून क्रेनने उचलेली प्लेट घसरून खाली पडली. त्यावेळी खाली उभा असलेला कामगार उमेश याच्या अंगावर ती प्लेट पडली. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागे

सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू
सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू

          तिरुअनंतपुरम - ‘जगीज् कूकबुक’ या कुकरी शोमुळे लोकप्रियते....

अधिक वाचा

पुढे  

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

           चंद्रपूर - राजुरा वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका व्य....

Read more