ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, ५ पोलिसांचे निलंबन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस कोठडीत आरोपीचा मृत्यू, ५ पोलिसांचे निलंबन

शहर : मुंबई

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात विजय सिंग या संशयिताच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी ५ पोलिसांचे निलंबन करण्यात आलंय. एका हाणामारीच्या प्रकरणात विजयसिंगला पोलिसांनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेलं होतं. चौकशीवेळी त्याचा कोठडीत मृत्यू झाला.

विजयच्या नातेवाईकांनी विजयच्या मृत्यूची चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन केलं. शिवाय पोलिसांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखलव घेऊन पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. य़ा प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडं देण्यात आलाय.

आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. तर आंदोलकांनी बेस्ट बसच्या काचा फोडल्यात.

विजय सिंग या तरुणाचा चौकशीदरम्यान पोलीस ठाण्यात मृत्यू झाला होता. पाच बडतर्फ पोलिसांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी आंदोलकांनी लाऊन धरली होती.

 

मागे

कोल्हापूरात 69 गावठी बॉम्ब सापडले
कोल्हापूरात 69 गावठी बॉम्ब सापडले

कोल्हापूर- कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावरील स्फोटाशी कोल्हापूर कनेक्....

अधिक वाचा

पुढे  

महिला तहसीलदाराला जिवंत जाळलं
महिला तहसीलदाराला जिवंत जाळलं

सरकारी अधिकारी सुरक्षित नसून त्यांचा जीवाला किती धोका आहे याचा प्रत्यय देण....

Read more