By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 06:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अकोला
अकोला : अकोल्यातील जठारपेठ चौकात असलेल्या इंद्रायणी गतीमंद शाळेजवळच्या ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये सोमवारी दुपारच्या दरम्यान संपत्तीच्या वादातून वडिलांनी मुलावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. बाबा भारती असे वडीलांचे नाव असून त्याच्या मुलाचे नाव मनिष भारती असे होते. बाबा भारती हे काँग्रेसचे नेते असल्याचे माध्यमातून समजते. बाबा भारती आणि त्यांचा मुलगा मनिष भारती यांच्यामध्ये संपत्तीचा वादाने परिसीमा गाठली होती.
मनीष हा वडलांच्या घरी धारदार शस्त्र घेऊन आला होता. बाबा भारती यांनी आपल्याकडे असलेली बंदूक काढली. बंदूक काढल्याचे पाहून मुलगा मनिष वडलांच्या अंगावर धावत आल्याचे दिसताच बाबा भारती यांनी मुलाच्या छातीमध्ये एक गोळी झाडल्याबरोबर मुलगा जागीच ठार झाला. या प्रकरणाची माहिती लागताच सिव्हील लाइन, रामदास पेठ यासोबतच शहर उपअधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, घटनेबाबत बाबा भारती यांनी पत्रकारांशी सवांद साधून घटनेची तोंडी माहिती सांगितली. दोन दिवस आधी मनिष भारती याला तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. मनिष भारती हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते.
वर्धा : वर्धामधील हिंगणघाट परिसराजवळच नंदेरी येथे आज सकाळी ७:३० च्....
अधिक वाचा