ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अफगाणिस्तानात महिला पत्रकाराची हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अफगाणिस्तानात महिला पत्रकाराची हत्या

शहर : विदेश

अफगाणिस्तानातील काबूलमध्ये कनिष्ठ सभागृह सल्लागार पदी कार्यरत असलेल्या महिला पत्रकाराची हत्या करण्यात आली. मेना मंगल कामावर जात असताना अज्ञात व्यक्तींनं त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. मेना मंगल या कनिष्ठ सभागृहात सल्लागार या पदावर कार्यरत होत्या. या घटनेत एकाहून अधिक व्यक्ती असल्याचा संशय गृहमंत्रालयाकडून व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

काबूल परिसरात एका मार्केटजवळ त्यांची हत्या करण्यात आली. दोघेजण मोटारसायकवरुन आले होते. ते मेना येणाऱ्या कारची वाट पाहत होते. मोटारसायकलवरील बंदूकधाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या. मेना यांच्या छातीत गोळ्या घुसल्याने त्या खाली कोसळल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.  दरम्यानमेना यांनी २०१७ मध्ये आपल्या मनाविरुद्ध होणाऱ्या विवाह आणि घटस्फोटाविषयी लिखान केले होते. त्यांनी हे लिखान सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यावेळी त्यांना अज्ञाताकडून धमकी मिळाली होती, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या एका प्रवक्ता नसरत रहिमी सांगितले की, एक संशयीत हल्लानंतर घटनास्थळावरुन पळून गेला आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. काबूल पोलिसांनी सांगितले की या हत्येमागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे किंवा व्यक्तिगत वादातून ही हत्या झाली आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेट आणि तालिबान दहशवादी संघटना कायम अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हल्ले करत आले आहेत.

 

मागे

दहशतवादी संघटना ISIS ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा
दहशतवादी संघटना ISIS ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा केला ....

अधिक वाचा

पुढे  

बारामतीमध्ये जन्मदात्या आईनेच केली मुलीची हत्या
बारामतीमध्ये जन्मदात्या आईनेच केली मुलीची हत्या

बारामतीमध्ये जन्मदात्या आईने मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्....

Read more