By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 06:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपूर - हैदराबाद व उन्नाव येथील घटनेनंतर नागपूर जवळच्या कळमेश्वरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी अशीच एक घटना रविवारी उघडकीस आली. तोंडात कापड कोंबून पाचवर्षीय मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला व त्यानंतर दगडाने डोके ठेचून तिची हत्या केली. पाच वर्षीय चिमुकली जिल्हा परिषद शाळेत बालवाडीला शिकत होती.
पाच वर्षांपूर्वी मुलीचे वडील मध्य प्रदेशातून कामाच्या शोधात कळमेश्वर येथे आले. ते मजुरी करतात. कळमेश्वर जवळच्या गावात मुलीचे आजोबा राहातात. आजोबांकडे जात असल्याचे सांगून ती घरून निघाली व आजोबाकडे गेली. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ती आजोबांकडून घरी जाण्यासाठी निघाली. मात्र, घरी पोहोचली नाही. रात्री सात वाजले तरी ती घरी आली नसल्याचे कळताच नातेवाइकांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना नागपुरातील संजय भारती यांच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात कापड व काड्या कोंबण्यात आल्या होत्या. या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पंचनामा केला तसेच शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून नराधम संजय पुरी याला अटक केली आहे. तो शेतमजुरी करतो. दारू पिऊन त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मुलीच्या हत्येनंतर संतप्त गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घातला होता. 'मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, नराधमाला फाशी द्या', अशा आशयाची फलके गावकऱ्यांच्या हातात होती. काही गावकऱ्यांनी कॅण्डल मार्चही काढला.
सातारा - पसरणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अ....
अधिक वाचा