By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : patna
बिहार - माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यावर सूनबाई ऐश्वर्या रायने मारहाणीचा आणि जबरदस्तीने बंगल्याबाहेर काढल्याचा आरोप केला आहे. ऐश्वर्या रायने सासूबाईंवर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे. “राबडी देवींनी माझ्या केसांना पकडून मला मारहाण केली. त्यानंतर १० सर्क्युलर रोडवर असणाऱ्या बंगल्यातून अंगरक्षकांकरवी मला घराबाहेर काढले” असा आरोप ऐश्वर्या रायने केला.
दरम्यान, ऐश्वर्या रायचे वडील आणि आमदार चंद्रिका राय यांना हा सर्व प्रकार समजताच त्यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी धाव घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिवालय पोलीस ठाण्यात राबडी देवी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दुखापतीमुळे ऐश्वर्याला रुग्णालयात नेण्यात आले होते.
ऐश्वर्या आणि राबडी देवी यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे समजल्यानंतर सचिवालय पोलीस स्टेशनचे पोलीस पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी आले होते. राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या मोठया मुलाबरोबर ऐश्वर्याचे लग्न झाले आहे. पाटण्याच्या व्हीव्हीआयपी झोनमध्ये लालूप्रसाद यादव यांचा बंगला आहे.
संध्याकाळी सहाच्या सुमारास ऐश्वर्या बंगल्याबाहेर आली व तिच्याबरोबर काय घडले त्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. तेजप्रतापला ऐश्वर्या रायपासून विभक्त व्हायचे आहे. त्यासाठी त्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
गडचिरोली – कुख्यात नक्षलवादी कॉम्रेड रामन्ना याच्यावर ....
अधिक वाचा