ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सपा नेत्याची घरासमोरच गोळ्या घालून हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 01, 2019 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सपा नेत्याची घरासमोरच गोळ्या घालून हत्या

शहर : देश

अलीगडच्या हरदुआगंज भागात समाजवादी पक्षाचे नेते राकेश यादव यांची मंगळवारी (३० एप्रिल) रात्री उशिरा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्यानंतर यादव यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येच्या सूचनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या कुणी आणि का केली? याचा पोलीस तपास करत आहेत.

एका बाईकवरून आलेल्या दोघांनी राकेश यादव यांच्यावर गोळ्या झाडल्याचं समजतंय. गोळी झाडल्याचा आवाज ऐकताच परिसरातील लोक घटनास्थळी जमा झाले. कुटुंबीयांनाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राकेश यादव यांना पाहताच धक्का बसला.

हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी राकेश यादव यांचा मृतदेह ताब्यात घेतला. कुटुंबीयांनी या हत्येचं कारण जमिनीचा वाद असल्याचं म्हटलंय. एका जमिनीवर प्लॉटिंग करण्यावरून राकेश यादव यांचा एकाशी वाद सुरू होता. यासंबंधात तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, हत्येमागचं खरं कारण शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

मागे

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आल्याची घटना घ....

अधिक वाचा

पुढे  

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी,पाच वर्षांचा कारावास
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी,पाच वर्षांचा कारावास

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स हेपबर्न बलात्कराच्या आरोपात दोषी ठरल....

Read more