By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ajmer
राजस्थानमधील अलवर येथे पतीबरोबर सासरी जाणार्या महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या नराधमांनी घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे अलवर येथे खळबळ उडाली असून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली आहे.
पतीसह मोटरसायकलवरून लालवाडीहून तालवृक्षकडे जात होती. थानागाजी-अलवर बायपास रोडवर दुहार चौगान या रस्त्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या 5 युवकांनी त्यांना थांबवले. हे सर्व युवक 20 ते 25 वयोगटातील होते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्या युवकांनी पतीला मारहाण केली आणि त्याला बांधून ठेवले. त्यानंतर अत्याचार केला.
या घटनेसंदर्भात पोलीस अधिक्षक राजीव पंचार यांनी सांगितले की, पीडित महिला व तिचा पती दोन मे रोजी माझ्याकडे आले होते. मी त्याच वेळी तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश दिले होते. तसेच थानागाजी पोलिसांना एक पथकाची निर्मिती करण्यास सांगितले. पण या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या पीडित पती-पत्नींना मानसिक धक्क्यात आहेत. व्हिडिओमध्ये सर्व आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांना अद्याप त्यांचा शोध घेता आला नाही. हे प्रकरण चार दिवस दाबून ठेवण्यासंदर्भात विचारणा केल्यास पोलीस ठाण्यातील प्रमुख सरदार सिंह यांनी सांगितले की, संबंधित महिला अनुसूचित जाती-जमातीची आहे त्यामुळे ही घटना कोणाला सांगितली नाही. आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे सिंह म्हणाले.
म्हातार्या, आधी पैसे दे, मग लग्न कर असं म्हटल्याने झालेल्या वादातून हा खून ....
अधिक वाचा