By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 03:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
नाशिक – शिर्डीमधून वर्षभरात तब्बल 88 भाविक महिला आणि तरुण गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अतिशय गंभीर असून शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गायब करून त्यातील महिलांना वेश्याव्यवसायास लावले जाते का? तसेच अन्य गायब भाविकांच्या अवयवांची तस्करी करणारे हे रॅकेट आहे का? याची एसआयटीतर्फे शोध मोहीम सुरू आहे. या प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाने जारी केले आहेत.
दरम्यान, न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. एम. गव्हाने यांनी नगरच्या पोलिस अधीक्षकांना आदेश दिले असून, मानवी तस्करी करणार-या आणि अवयवांची तस्करी करणा-या टोळीचा शोध घ्यावा आणि लवकरात लवकर करवाई करावी, असे आवाहन केले आहे.
एका वर्षात 88 जण गायब झाले ही माहिती केवळ जे पोलिस ठाण्यापर्यंत पोहचलेले आहेत त्यांचीच आहे. परंतु अतिशय हालाखीची परिस्थिती असलेली कुटुंबे न्यायालयापर्यंत अद्याप पोहचलेली नाहीत. खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून शिर्डी परिसरातील गायब झालेल्या व्यक्तीचा शोध सुरू करावा व त्याची माहिती खंडपीठात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी 10 जानेवारी 2020 रोजी अपेक्षित आहे.
गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना बेड्या ठोकण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाख....
अधिक वाचा