ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलांना कोंडून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलांना कोंडून ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बेड्या

शहर : मुंबई

घरकाम करणार्‍या ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिला आणि तिच्या दोन मुलांना कोंडून ठेवणार्‍या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या या पोलीस अधिकार्‍याला विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा खळबळजनक प्रकार शनिवारी रात्री विक्रोळी कन्नमवार नगर येथे घडला असून अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित करण्यात आले आहे. प्रफुल्ल आगवणे (४६) असं अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकार्‍याचे नाव असून तो कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे.

विक्रोळी परिसरातील कन्नमवार नगर येथे राहणार्‍या आगवने यांच्या घरी गेल्या एका वर्षांपासून ३१ वर्षीय महिला ही घरकाम करण्यासाठी येत होती. शनिवारी पीडित महिला आपल्या दोन मुलांसह पोलीस उपनिरीक्षक आगवणे याच्या घरी घरकाम करण्यासाठी आली होती. दरम्यान आगवणे हा तिला एका एका खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार करून याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. विक्रोळी पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या पीडित महिलेची आणि मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

मागे

घाटकोपरमध्ये दिवसाढवळ्या  गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या
घाटकोपरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या झाडून एका व्यक्तीची हत्या

मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात सोमवारी सकाळी एका व्यक्तीची गोळ्या झाडून ....

अधिक वाचा

पुढे  

अरुणाचलमध्ये आमदारासहीत कुटुंबीयांवर दहशतवाद्यांचा क्रूर हल्ला, ७ ठार
अरुणाचलमध्ये आमदारासहीत कुटुंबीयांवर दहशतवाद्यांचा क्रूर हल्ला, ७ ठार

देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच अरुणाच....

Read more