ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 03:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

शहर : देश

             विवाहजुळणी संकेतस्थळावरून तपशील घेत शहरातील ‘आरजे’ (रेडिओ जॉकी) तरुणीला आर्थिक गंडा घालू पाहणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली. या तरुणाने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमीळनाडू, केरळ आदी राज्यांमधून ६७ महिलांना अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवरून पसरवण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. यापैकी महाराष्ट्रातून आणखी दोन तरुणी तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत.
           

           विजय अलेक्झांडर असे त्याचे नाव असून त्याने ‘बीबीएम’चे शिक्षण पूर्ण केले आहे. तक्रारदार तरुणीने काही दिवसांपूर्वी विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपले तपशील दिले होते. ते वाचून विजयने संपर्क साधला. चेन्नईतील रहिवासी भासवून पेशा, आर्थिक परिस्थितीबाबत त्याने तरुणीला खोटी माहिती दिली. काही दिवसांनी विजयने तरुणीकडे पैशांची मागणी सुरू केली. कार्ड तपशिलांची मागणी सुरू झाल्यानंतर तिला संशय आला. तिने विजयसोबतचा संपर्क तोडला. 


             मात्र समाजमाध्यमे आणि विविध अॅलपद्वारे विजयने तक्रारदार तरुणीचा पाठलाग सुरूच ठेवला. अश्लील छायाचित्र व्हायरल करेन, अशी धमकी दिल्यानंतर मात्र तरुणीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील निरीक्षक प्रमोद खोपीकर, सहायक निरीक्षक रवी नाळे, हवालदार सुधाकर इंदप, शिपाई मयूर थोरात या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे विजयला अटक केली.


           विजयचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी त्याने झोमॅटो अॅमपवरून अन्नपदार्थ मागवले आणि तोच दुवा पकडून पथकाने त्याला गाठले. झोमॅटो, संबंधित हॉटेल कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत पथकाने विजयचा नेमका पत्ता मिळवला. विजय तिथे नव्हता. चौकशीत विजय अॅापआधारित टॅक्सी सेवेत चालक म्हणून कार्यरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने शक्कल लढवत नाताळनिमित्त केक, पेस्ट्री एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवण्याचे निमित्त करत विजयशी थेट संपर्क साधला. टॅक्सी शुल्काव्यतिरिक्त दहा टक्के दलाली देऊ, असे सांगताच विजय पथकाच्या सापळय़ात सहज अडकला.
 

मागे

मुशर्रफ यांना पाच खटल्यात फाशी, मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार
मुशर्रफ यांना पाच खटल्यात फाशी, मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ  यांना विशेष न्यायालयाने फाशी....

अधिक वाचा

पुढे  

बलात्कार करून सात वर्षीय मुलीची हत्या
बलात्कार करून सात वर्षीय मुलीची हत्या

                 ठाण्यामध्ये भिवंडी परिसरात एका सात वर्षीय चिमूरडी....

Read more