By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सूरत बलात्कार प्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज (शुक्रवार) न्यायालयात सुरत रेप केस प्रकरणी सुनावणी होती. 30 एप्रिलला न्यायालय ही नारायण साईला शिक्षा सुनावणार आहे. सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईंवर आहे. नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत.
बलात्कार, लैंगिक शोषण, अनैतिक संबंध बनवणे आणि इतर आरोप प्रकरण सुरत पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये सूरत पोलिसांनी ही तक्रार दाखल करुन घेतली. यामधील एक तक्रार ही आसाराम तर दुसरी तक्रार ही नारायण साई याच्याविरूद्ध होती. दोन बहीणींपैकी लहान बहिणीने नारायण साईवर आरोप केला होता. 2002 ते 2005 पर्यंत आपले सलग लैंगिक शोषण केल्याचा आरोप नारायणवर होता. यावेळी पीडित सूरत येथील आश्रमात राहत होती.
विविध बॅँका, फायनान्स कंपन्यांचे हजारो, लाखोंचे कर्ज बुडविलेल्या थकबाकीदा....
अधिक वाचा