ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सासवडमध्ये मिलिंद एकबोटेंना केली मारहाण

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सासवडमध्ये मिलिंद एकबोटेंना केली मारहाण

शहर : पुणे

सासवड येथील एका कार्यक्रमात मिलिंद एकबोटेंना मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह 45 ते 50 जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सासवड येथील झेंडेवाडीमध्ये काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो, अशा स्वरूपाची पोस्ट एकबोटेंनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्या रागातून मोडक आणि त्यांच्या 45 ते 50 समर्थकांनी एकबोटे यांच्यावर हल्ला केला. मोडक यांच्या समर्थकांनी एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह 40 ते 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागे

लाहोरमधील सुफी दर्ग्याबाहेरील स्फोटात 9 ठार; 24 जण जखमी
लाहोरमधील सुफी दर्ग्याबाहेरील स्फोटात 9 ठार; 24 जण जखमी

पाकिस्तानामधील सुफी दर्गा आज शक्तिशाली स्फोटाने हादरलं. त्यात किमान आठ जण ....

अधिक वाचा

पुढे  

दंतेवाडामध्ये महिला कमांडोंनी केला 2 नक्षल्यांचा खात्मा
दंतेवाडामध्ये महिला कमांडोंनी केला 2 नक्षल्यांचा खात्मा

दंतेवाडा येथे डीआरजी आणि एसटीएफच्या पथकाने आज एक चांगली कारवाई केली. या कार....

Read more