ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धुळ्यामध्ये भाजप महापौरांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर हल्ला

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 04:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धुळ्यामध्ये भाजप महापौरांकडून शिवसेना जिल्हा प्रमुखावर हल्ला

शहर : धुळे

भाजप महापौरांनी शिवसेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जुने धुळे येथे घडली. हिलाल माळी असे शिवसेना जिल्हा प्रमुखाचे नाव असून, याप्रकरणी महापौर पिता, पुत्रांसह आठ जणांवर आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख एका हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी येत होते. त्यावेळी भाजप महापौर पिता, पुत्रांसह अन्य आठ जणांनी हिलाल माळी यांच्यावर लाठ्या, काठयांनी हल्ला केला. बेदम मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. यात माळी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. याप्रकरणी महापौर पिता, पुत्रांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आझाद नगर पोलीस करीत आहेत.

मागे

पुणे विमानतळावर 31 लाखांचे सोने जप्त
पुणे विमानतळावर 31 लाखांचे सोने जप्त

दुंबइमधून डोक्यावर घातलेल्या विगमध्ये लपवून आणलेले 31 लाखांचे 957.10 गॅ्रम सोन....

अधिक वाचा

पुढे  

धक्कादायक : 55 वर्षाच्या डॉक्टरने केला 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार
धक्कादायक : 55 वर्षाच्या डॉक्टरने केला 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार

मुंबईमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 55 वर्षाच्या डॉ....

Read more