ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इंदापूरात मुलीच्या प्रियकराला धमकी देऊन पेटवून देण्याचा प्रयत्न

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 01:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इंदापूरात मुलीच्या प्रियकराला धमकी देऊन पेटवून देण्याचा प्रयत्न

शहर : पुणे

मुलीच्या प्रेमसंबंधाची  माहिती मिळताच तरुणाला धमकी देऊन त्याच्या अंगावर रॉकेल व पेट्रोल ओतून पेटवून देऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार इंदापूरात घडला आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील ऑनर किलिंगचा प्रकारापाठोपाठ हा प्रकार समोर आला असून इंदापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी संतोष घोरपडे सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी किस्मत शब्बीर शेख (19) यांनी इंदापूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना 3 मे रोजी टन्नु नरसिंगपूर येथे रात्री दहा वाजता घडली होती.
किस्मत शेख याचे गावातील एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. हे या मुलीच्या घराच्यांना समजल्यानंतर त्यांनी 3 मे रोजी रात्री शेख याला त्यांच्या घरी बोलावून घेतले. त्याला तूू आमच्या मुलीचा नाद सोड असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष घोरपडे व इतरांनी त्याचा अंगावर रॉकेल व पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. त्यात शेख हा भाजला असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सोलापूरमधील बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी रुग्णालयात जाऊन शेख याचा जबाब नोंदवून घेतला. त्यात ही बाब पुढे आल्यावर त्यांनी याची नोंद घेतली. हा सर्व प्रकार इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने त्यांनी ती तक्रार इंदापूर पोलिसांकडे पाठवून दिली. इंदापूर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा तिघांविरुद्ध दाखल केला आहे.

मागे

शिवसेना नगरसेवकाला कमलेश भोईर यांना लाच घेताना अटक
शिवसेना नगरसेवकाला कमलेश भोईर यांना लाच घेताना अटक

शिवसेनेचे नगरसेवक कमलेश यशवंत भोईर यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना काल रात....

अधिक वाचा

पुढे  

अमेरिकेत खासगी विमानाला आग; 13 ठार
अमेरिकेत खासगी विमानाला आग; 13 ठार

लास वेगासहून जाणारे हे विमान मेक्सिकोमध्ये कोसऴले असून त्यामध्ये 13 जणांचा ....

Read more