ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फ्रान्सपाठोपाठ ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 03, 2020 10:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

फ्रान्सपाठोपाठ ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू

शहर : विदेश

युरोपातील ऑस्ट्रिया देशाची राजधानी असलेल्या व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्ला झाला आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी २६/११ प्रमाणे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २ लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेली मेलच्या माहितीनुसार, आतापर्यंत एका दहशतवादाच्या खात्मा झाला असून २ स्थानिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

व्हिएन्ना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजता गोळीबाराची घटना घडली. दहशतवाद्यांनी गोळ्यांचे अनेक राऊंड केले. गोळीबाराची ही घटना शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. या घटनेत अनेक लोकं जखमी झाले. ज्यामध्ये एका ऑफिसरचा देखील समावेश आहे.

व्हिएन्नाच्या पोलिसांनी जनतेला ट्विट करून सावधान राहण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्यास सांगितलं आहे.

 

मागे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सात मालमत्तांचा लिलाव, तारीख ठरली
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या सात मालमत्तांचा लिलाव, तारीख ठरली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) संपत्तीचा सफेमा म्हणजेच स्मगलिंग ....

अधिक वाचा

पुढे  

साडेपाच हजारांचा ड्रेस मागवला, पार्सलमधून जुन्या, वापरलेल्या साड्या आल्या; वसईत महिलेची ऑनलाईन फसवणू
साडेपाच हजारांचा ड्रेस मागवला, पार्सलमधून जुन्या, वापरलेल्या साड्या आल्या; वसईत महिलेची ऑनलाईन फसवणू

सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांनी शॉपिंगला सुरुवात केली असेल. परंतु स....

Read more