ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१९९० ते १ डिसेंबर २०१९ पर्यंत २२ हजार ५५७ दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा..!

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 04:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१९९० ते १ डिसेंबर २०१९ पर्यंत २२ हजार ५५७ दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा..!

शहर : देश

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर सध्या काश्मीरमध्ये असलेल्या परिस्थितीबाबत आज लोकसभेत सदर विश्लेशन झाले. कलम ३७० हटवण्यात आल्यापासून सीमेपलीकडून ८४ वेळा घुसखोरी करण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी दिली आहे. तसेच, १९९० पासून ते १ डिसेंबर २०१९ पर्यंत तब्बल २२ हजार ५५७ दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा झाला असल्याची देखील माहिती दिली.

याशिवाय २००५ पासून ते ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या १०११ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, ४२ दहशवतादी पकडले गेले तर २ हजार २५३ दहशतवाद्यांना जवानांकडून पिटाळून लावण्यात आले आहे. तसेच, ऑगस्ट महिन्यात ५९ वेळा दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी, काश्मीरची परिस्थिती संपूर्णपणे सर्वसाधारण असल्याचे सांगितले. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना सोडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्यावतीने घेण्यात येईल आणि तेथील प्रकरणांमध्ये केंद्र सरकार दखल देणार नसल्याचे स्पष्ट केले.
 

मागे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं 20 डिसेंबरपासून सरकार विरोधात मौनव्रत आंदोलन...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं 20 डिसेंबरपासून सरकार विरोधात मौनव्रत आंदोलन...

अहमदनगर - देशात अनेक ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तरीही या घटनेविरुद....

अधिक वाचा

पुढे  

१६८ किलो कांद्याची चोरी केल्याने दोघे पोलिसांच्या ताब्यात...
१६८ किलो कांद्याची चोरी केल्याने दोघे पोलिसांच्या ताब्यात...

मुंबई - सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दरवाढीने पाणी आणले आहे. आता तर कांद....

Read more