By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
भिवंडीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे चार ते पाच दरोडेखोरांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटीतील 10 ते 12 लाख रुपयांची रोकड चोरली असून मंदिरातील सुरक्षा रक्षकाला खांबाला बांधून दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेच्या निषेधार्थ वज्रेश्वरीत शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली आहे. त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरातील दानपेट्या फोडल्या. किमान दहा ते पंधरा दरोडेखोर होते, अशी माहिती देवी संस्थानच्या एका सदस्यानं दिली. स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत आहे. मंदिरातून किती मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप समजू शकलं नाही. दरम्यान, मंदिरावरील दरोड्याच्या घटनेच्या निषेधार्थ वज्रेश्वरी गावातील नागरिकांनी बंद पाळला आहे.
नक्षलींचा हिंसाचार सुरुच असून बुधवारी दुपारी नक्षलींनी एटापल्लीत तालुक्य....
अधिक वाचा