ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 03, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजप आमदाराकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

शहर : ahmedabad

गुजरातच्या नरोदा येथे भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कुबेरनगर परिसरात हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या समस्येवर जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीच्या नीतू तेजवानी नरोदामधील भाजपचे आमदार बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील घरे आणि कार्यालयांतील कापलेल्या नळजोडण्या दोन दिवसांत पुन्हा दिल्या नाहीत तर, कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा त्यांनी थवानींना दिला.

यानंतर बलराम थवानी यांनी माझे काहीही ऐकून घेताच माझ्या कानशिलात लगावली. त्यांच्या समर्थकांनी आम्हाला तेथून जबरदस्तीने हटवायला सुरुवात केली. या झटापटीत मी खाली पडले तेव्हा थवानी यांनी मला लाथा मारायला सुरुवात केली. या लोकांनी माझ्या नवऱ्यालाही मारले. त्यामुळे भाजपच्या राज्यात महिला कशा सुरक्षित राहणार, एवढाच प्रश्न मला पंतप्रधान मोदींना विचारायचा असल्याचे तेजवानी यांनी म्हटले.

ही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर थवानी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. कुणालाही मारहाण करण्याचा माझा हेतू नव्हता. जमावाकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. स्वसंरक्षणासाठी मारलेली लाथ चुकून महिलेला लागली, असे त्यांनी सांगितले. हा वाद वाढल्यानंतर थवानी यांनी माफी मागितली आहे.या घटनेनंतर नीतू तेजवानी यांनी बलराम थवानी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नीतू तेजवानी यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनीही या घटनेचा तपास सुरु केला आहे. आम्ही वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडिओ पाहिला आणि आता आमच्याकडे या प्रकरणी तक्रारही आल्याची माहिती  झोन ४चे पोलीस उपायुक्त नीरज बडगुजर यांनी दिली.

 

       

                                                                


 

मागे

रॉबर्ट वाड्रा यांना झटका, लंडनला जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली
रॉबर्ट वाड्रा यांना झटका, लंडनला जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली

मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि ....

अधिक वाचा

पुढे  

बाळास जन्म देऊन आई फरार
बाळास जन्म देऊन आई फरार

सोमवारी रात्री ८ वाजता पांढरकवडा आगाराची बस (क्र. एमएच ०६ एस ८८२४) यवतमाळकरि....

Read more