ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इंटरपोलची नित्यानंदविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 12:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इंटरपोलची नित्यानंदविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी

शहर : bangalore

         बंगळूर : अत्याचार, लैंगिक छळ, अपहरण, मानवी तस्करी आदी भयानक आरोप असलेल्या स्वयंघोषित धार्मिक गुरु नित्यानंदविरुद्ध इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. गेल्या वर्षापासून तो भारतातून फरारी झाला आहे. त्याचा पोलीस आणि तपास यंत्रणा कसून शोध घेत आहेत. त्याचे बंगळूर व गुजरातसह अनेक ठिकाणी आश्रम आहेत. 

      स्वयंघोषित धार्मिक गुरु नित्यानंद भारतातून फरारी झाल्यानंतर इक्वेडोरमध्ये असल्याचे वृत प्रसिद्ध झाले होते. इतकेच काय पण तेथे एक व्दीप खरेदी करून नवे हिंदू राष्ट्र तो निर्माण करणार असल्याचेही जाहीर झाले होते. मात्र तेथील सरकारने तो आपल्या देशात नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेर गुजरात पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार इंटरपोलने त्याच्यावर ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. 

        गुन्हेगारी प्रकरणे नोंद असणारी व्यक्ति फरारी झाल्यानंतर इतर देशात लपून बसण्याची शक्यता असते. त्या देशामध्ये त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलिसांकडून इंटरपोल नोटीस बजावण्यात येते.     
 

मागे

निर्भया: दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजार रुपये खर्च
निर्भया: दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजार रुपये खर्च

       नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींन....

अधिक वाचा

पुढे  

बीड जिल्ह्यात विहिरीमध्ये आढळले दोन मृतदेह
बीड जिल्ह्यात विहिरीमध्ये आढळले दोन मृतदेह

         बीड : बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या बिंदुसरा नदीच्या पात्राजवळी....

Read more