ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काकतीमध्ये पबजीमुळे एकाचा खून

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 05:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काकतीमध्ये पबजीमुळे एकाचा खून

शहर : बेळगाव

रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोपायाला सांगितलं. मुलाला सांगूनही ऐकत नाही असे दिसल्यावर त्यांनी मुलाचा मोबाइल काढून घेतला.त्यामुळं संतापलेल्या मुलानं आजूबाजूच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी मुलगा आणि पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून समज दिली. आणि रात्री घरी येऊन मग ते झोपले. मात्र मोबाइल घेतल्याचा राग डोक्यात ठेऊन मुलगा झोपला होता. उठल्यानंतर त्याने घरातील विळी घेऊन वडिलांची हत्या केली.

हत्या केल्यावर त्यानं वडिलांचे हात, पाय आणि मान कापली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अटक केल्यावर तरुणाने मला वडिलांच्या मृतदेहाचे आणखी तुकडे करायचे होते असं सांगितलं. वडिलांची हत्या करताना त्यानं आईला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. . सोमवारी पहाटे पाच वाजता सिद्धेश्वर नगर ,काकती इथं ही घटना घडली

रघुवीर कुंभार असं या तरुणाचं नाव आहे.अटक करण्यात आलेला हा तरुण तीन वेळा डिप्लोमा परीक्षेत नापास झाला होता आणि बेरोजगार होता. घरीच बसून होता. रघुवीर ला पब जी खेळाचे प्रचंड वेड होते. त्यासाठी मुलगा व वडील यांच्यात अनेकदा वाद झाले होते. वडिल शंकर देवाप्पा कुंभार जिल्हा सशस्त्र दलात पोलीस अधिकारी होते. तीन महिन्यापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते. काकती पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. 

 

 

 

मागे

संसदेत चाकूसह प्रवेश करणार्‍या संशयित तरुणाला अटक
संसदेत चाकूसह प्रवेश करणार्‍या संशयित तरुणाला अटक

सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने संसदेसमोरील मार्ग वाहतुकीसाठ....

अधिक वाचा

पुढे  

अतिरिक्त गोळ्या सेवन,महिलेचा मृत्यू
अतिरिक्त गोळ्या सेवन,महिलेचा मृत्यू

काही वेळेस क्षुल्लक डोके दुखी सर्दी पडस यासाठी आपणाला गोळ्या घेऊन  उपचार ....

Read more