ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कॅलिफोर्नियाच्या सिनेगॉगमध्ये गोळीबार,एका महिलेचा मृत्यू

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कॅलिफोर्नियाच्या सिनेगॉगमध्ये गोळीबार,एका महिलेचा मृत्यू

शहर : विदेश

कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो जवळ एका सिनेगॉगमध्ये गोळीबार झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. तर, सिनेगॉगमध्ये प्रार्थनेच्या वेळी १९ वर्षीय तरुणाने बेछूट गोळीबार केलाय. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. तर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिलीय. सिनेगॉगमध्ये गोळीबार करणाऱ्याचे नाव अद्याप देण्यात आलेले नाही. पण गोळीबारानंतर हल्लेखोर कारमधून पळून गेला आणि त्याने स्वतः ९११ क्रमांकावर संपर्क साधून त्यानेच हा गोळीबार केला असल्याचे सांगितले अशी माहिती सॅन दिएगोचे मुख्य पोलीस अधिकारी डेव्हिड निसलेट यांनी प्रसारमाध्यमांना दिलीय.

कारमधून पळून गेलेल्या हल्लेखोराला रस्त्यात पोलिसांनी गाठले आणि त्याला शरणागती पत्करण्यास सांगितली. त्यावेळी हल्लेखोर स्वतः हात वर करून कारच्या बाहेर आला आणि त्याने शरणागती पत्करली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्या कारमधून AR-type प्रकारची रायफल देखील हस्तगत करण्यात आली आहे.

मागे

धक्कादायक! तृणमूल काँग्रेसला मत दिले नाही म्हणून पत्नीला पाजले अ‍ॅसिड
धक्कादायक! तृणमूल काँग्रेसला मत दिले नाही म्हणून पत्नीला पाजले अ‍ॅसिड

पश्चिम बंगाल येथे मुर्शिदाबादमध्ये एका महिलेने तृणमूल  काँग्रेसला मत दि....

अधिक वाचा

पुढे  

राज्याच्या उपराजधानीत ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या
राज्याच्या उपराजधानीत ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून हत्या

राज्याची उपराजधानी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या ....

Read more