By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 08:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटू सागर धनकड याच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक विजेता सुशील कुमारला अटक झाली आहे. या कारवाईनंतर उत्तर रेल्वेने मंगळवारी सुशील कुमारला सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या निलंबनाचा आदेश अबाधित राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुशील कुमारला अनेक पदोन्नतीनंतर उत्तर रेल्वे येथे डेप्युटी चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते.
सागर धनकड हत्या प्रकरणात प्रथम दिल्ली सरकारने पत्र लिहून सुशीलच्या अटकेविषयी रेल्वेला कळवले होते. यानंतर रेल्वे बोर्डाने उत्तर रेल्वेला पत्र लिहिले. यानंतर सुशीलला निलंबित करण्यात आले आहे.
उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी म्हटलं की, सुशील कुमारविरुद्ध तपास सुरु आहे. त्याला 23 मे 2021 रोजी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. म्हणूनच त्याच्या अटकेच्या तारखेपासून त्यांची सेवा निलंबित केली जात आहे. विशेष म्हणजे सागर धनकड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील कुमार जवळजवळ दोन आठवडे पोलिसांपासून पळत होता. पण सुशीलला मुंडका परिसरातून अटक करण्यात आली.
सागर धनकडचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट
सागर धनकड याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघडकीस आलेल्या माहितीनुसार, सागर धनकड यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आहेत. डोक्यापासून गुडघ्यापर्यंत जखमा आढळल्या आहेत. त्याच्या अंगावर 1 ते 4 सेंटीमीटर खोल जखमा असल्याने त्याच्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची माहिती पोस्टमार्टममधून समोर आली आहे. या जखमा इतक्या खोल होत्या की हाडांपर्यंत पोहोचल्या आहेत. छाती आणि पाठीवर 5x2 सेंमी आणि पाठीवर 15x4 सेंमी जखमा आढळल्या आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घे....
अधिक वाचा