ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉन छोटा राजन गँगचे दोन खतरनाक गँगस्टर मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात परस्परांना भिडले.

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 02:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉन छोटा राजन गँगचे दोन खतरनाक गँगस्टर मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात परस्परांना भिडले.

शहर : मुंबई

मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन गँगचे दोन खतरनाक गँगस्टर मुंबई सत्र न्यायालयाच्या आवारात परस्परांना भिडल्याची घटना समोर आली आहे. दिलीप बोरा उर्फ डी.के.राव आणि अनिल पाटील यांच्यातील शाब्दीक वादावादीचे रूपांतरण हाणामारीत झाले.

तर, खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि हत्येच्या ३० गुन्ह्यांमध्ये डी.के.रावचे आरोपी होता. पण बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्याची सुटका झाली आहे. तर, दोनवेळा त्याने मृत्यूला चकवा दिलाय. तर, एकदा चकमकीच्यावेळी त्याने मृत झाल्याचे भासवले होते. राव आणि पाटीलला खंडणीच्या प्रकरणात गुन्हे शाखेने २०१८ मध्ये अटक केली. मोक्का कोर्टात त्यांच्यावर खटला सुरु आहे. सोमवारी दोघांना आर्थर रोड तुरुंगातून सत्र न्यायालयात आणण्यात आणले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी.के.राव विकासकाकडून पैसे मागवण्यासाठी अनिल पाटीलवर दबाव टाकत होता. तसेच, राव आणि पाटील यांच्यासोबत दोन पोलिसांच्या टीम होत्या. दोघे चौथ्या मजल्याच्या पायऱ्यांवर सुनावणीच्या प्रतिक्षेमध्ये थांबले होते. त्यावेळी ही वादावादी झाली.

तर, अनिल पाटीलची मुलं त्याला नैतिक पाठिंबा देण्यासाठी कोर्टात उपस्थित होती. त्यांनी सुद्धा राववर हात उचलला. त्यानंतर डी.के.राव मोक्का कोर्टात पळाला आणि विशेष न्यायाधीशासमोर तक्रार केली. कोर्टाच्या सुरक्षारक्षकांनी पाटील आणि त्याच्या मुलांना कोर्टरुममध्ये प्रवेश करण्यापासून रोखले. न्यायाधीशांनी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगितले.

मागे

धक्कादायक! किस करताना रागात गर्लफ्रेंडच्या ओठाचा घेतला चावा 
धक्कादायक! किस करताना रागात गर्लफ्रेंडच्या ओठाचा घेतला चावा 

दक्षिण कॅरोलिन या भागात बॉयफ्रेंडने आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे किस करताना र....

अधिक वाचा

पुढे  

छत्तीसगढमध्ये भाजपच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; पाच जणांचा मृत्यू
छत्तीसगढमध्ये भाजपच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; पाच जणांचा मृत्यू

छत्तीसगढमध्ये दंतेवाडा परिसरात मंगळवारी नक्षलवाद्यांनी भाजपच्या ताफ्या....

Read more