By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 04:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
ध्वज वंदनासाठी शाळेत जाणार्या संभाजी शिंदे या 9 वर्षाच्या मुलाला झाल्ता फाटा येथे आज सकाळी भरधाव आलेल्या कारने चिरडले. यात हा मुलगा जागीच ठार झाला. स्वतंत्र्यदिनानिमित शाळेत आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाष चंद्र बोस यांची भूमिका साकारणार होता.
या अपघातानंतर कारचालक पसार झाला. अपघातामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. परिणामी झाल्ता फाटा ते केंब्रिज रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून सर्व वाहतूक बीड बाह्यवळण रस्त्यावरून वळविण्यात आली आहे.
सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी रोख मदतीसह इतर काही जीवनावश्यक वस्तूंची....
अधिक वाचा