By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 06:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक बि.आर.शेट्टी यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दोषी ठरलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोक्का न्यायालयाने आठ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हत्येचा कट आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली छोटा राजनला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की 3 ऑक्टोबर 2012 रोजी रात्री बि.आर.शेट्टी आपल्या गाडीने अंधेरीतून चालले होते. त्यावेळी बाइकवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या कारला घेराव घालून त्यांच्यावर फायरिंग केली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ धीरूभाई अंबानी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी छोटा राजन आणि त्यांच्या टोळीचा हात असल्याची माहिती समोर आली. मुंबई क्राइम ब्रांचने यासंबंधी चार्जशिट दाखल केली होती. तेव्हापासून हा खटला सुरू होता. त्याचा निकाल आज लागला.
अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेट्टी यांनी बे....
अधिक वाचा