By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 06:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पिंपरी - पिंपरी परिसरातील चिखली भागात राहणार्या सासरच्या कुटुंबियांनी महिलेलवर अनैसर्गिगरित्या मानसिक आणि शारीरिक छळ केला. हा प्रकार २०१९ च्या एप्रिल ते डिसेंबरपर्यंत घडला असून याप्रकरणी २१ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात कुटुंबावर गुन्हा दाखल केला आहे.
सासरच्यांनी म्हणजेच सासू, सासरे, पती, भाचा, नणंद आणि अन्य तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार एफ.आय.आर केलेल्या महिलेवर त्यांनी शिवीगाळ, मारहाण, वाईट संगतीत राहण्यास प्रवृत्त केले तसेच, वाईट सवयी शिकवल्या आणि वेळोवेळी छळ करून त्रास देत होते.
दरम्यान, चिखली पोलीसांनी या प्रकरणी दखल घेतली असून फिर्यादी महिलेची विचारपूस करून अधिक तपास करीत आहेत.
विरार - विरार पश्चिम भागातल्या विराटनगर परिसरातील ग्रीष्मा पॅल....
अधिक वाचा