By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 02:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सीएसएमटी येथे 14 मार्च रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 34 जण जखमी झाले होते. याप्रकरणी आता चौथी अटक करण्यात आली आहे. शितला प्रसाद कोरी असे या अटक करण्यात आलेल्या सब इंजिनिअरचे नाव आहे. सब इंजिनिअर शितला प्रसाद कोरी दोन वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शितला प्रसाद कोरी यांच्या कार्यकाळात पुलाची पाहणी केली गेली होती. त्या पाहणी अहवालावरती कोरी यांची सही देखील आहे. त्यामुळे कामात कसूर झाल्यानं जबाबदार ठरवत शितला प्रसाद कोरी यांना अटक करण्यात आली आहे. 14 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडली होती. यापूर्वी महापालिकेनं दोन मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 1981 साली हा पूल बांधण्यात आला होता. तेव्हापासून याच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडे आहे.
लास वेगासहून जाणारे हे विमान मेक्सिकोमध्ये कोसऴले असून त्यामध्ये 13 जणांचा ....
अधिक वाचा