ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उल्हारनगरमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचार्‍याचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 07:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उल्हारनगरमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचार्‍याचा मृत्यू

शहर : मुंबई

निवडणूकीच्या कामे करताना महापालिकाचे कर्मचारी भगवान मगरे यांचा दुपारी मृत्यू झाला. सी ब्लॉक येथील मतदार केंद्रात काम करीत असतांना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर, त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. उल्हासनगर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते. सकाळी निवडणूक साहित्य घेतल्यानंतर कॅम्प नं-3 सी ब्लॉक येथील मीनल अर्जुन चव्हाण विद्यालयात निवडणूक मतदार केंद्र 87 मध्ये भगवान मगरे सहकार्‍यांसोबत गेले होते. दुपारी मतदारसंघात निवडणुकांसाठीचे काम करीत असतांना, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बेशुद्ध पडलेल्या मगरे यांना सहकार्‍यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासाअंती मृत घोषित केले. सदरची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस व कुटुंबाला देण्यात आली.
 

मागे

99 ऐवजी दिले 0 गुण दिले म्हणून 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या
99 ऐवजी दिले 0 गुण दिले म्हणून 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या

तेलंगणातील 12 वी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसात 21 विद्यार्थ्यांन....

अधिक वाचा

पुढे  

अभिजित देशमुखला गुन्हे शाखेया पथकाने ठोकल्या बेड्या
अभिजित देशमुखला गुन्हे शाखेया पथकाने ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखेच्या पथकाने कोट्यवधी रुपये बुडवणार्‍या शेतकरी साखर कारखान्या....

Read more