By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 03:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर कोन्हाळी येथे भीषण अपघात झाला. मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रचारासाठी अक्कलकोट येथे आले होते. तेथे त्यांची जाहीर सभा होती. त्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस शिपाई आरती साबळे या सकाळीच अक्कलकोटला गेल्या होत्या. बंदोबस्त संपल्यानंतर तेथून आपल्या दुचाकीवरून साबळे सोलापूरकडे परत निघाल्या होत्या. परंतु अक्कलकोटपासून काही अंतरावर कोन्हाळी येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात साबळे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
सोमवारी क्राईम ब्रँचने तुरुंगातून पळून गेलेल्या आरोपीला 33 वर्षानंतर अटक क....
अधिक वाचा