ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Deep Siddhu Arrested | प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, अभिनेता दीप सिद्धूला अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Deep Siddhu Arrested | प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, अभिनेता दीप सिद्धूला अटक

शहर : देश

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला (Deep Siddhu Arrested) अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते. (Deep Siddhu accused in 26th January violence case arrested)

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. बूटा सिंह, सुखदेव सिंह, जजबीर सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर प्रत्येकी 50 हजारांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तर दीप सिद्धूसह जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते.

हिंसेच्या चौकशीसाठी एसआयटी

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. जॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करत आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात जॉय टिर्की, भीष्म सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश आहे.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी हिंसाचार

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेत 394 पोलीस जखमी झाले होते. त्यात पोलिसांच्या 30 गाड्यांचे नुकसान झालं होतं. दिल्ली पोलिसांनी या हिंसेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना प्रत्येकी 25-25 हजार रुपयांची आर्थिक मदत तर इतर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. (Deep Siddhu accused in 26th January violence case arrested)

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धू, मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 1984 मध्ये झाला होता. तो एक पंजाबी अभिनेता आहे. दीप सिद्धूने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी रिलीज झाली. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

सिद्धू अभिनेत्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या टीमने त्यांना स्वतःसोबत सहभागी करुन घेतले. जेणेकरुन तो स्थानिक लोकांना सनी देओल यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करु शकेल.

 

मागे

मुलींना वाटलं त्या वेबसिरिजसाठी काम करतायत, पण त्यांचे पॉर्न व्हीडीओ थेट...
मुलींना वाटलं त्या वेबसिरिजसाठी काम करतायत, पण त्यांचे पॉर्न व्हीडीओ थेट...

मुंबई शहरात चित्रपटात नशीब आजमवण्यासाठी तरुण तरुणी स्वप्न घेऊन येत असतात, ....

अधिक वाचा

पुढे  

लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!
लाल किल्ल्यात कसे पोहोचले? काय होतं प्लानिंग? दीप सिद्धूने केला मोठा खुलासा!

शेतकरी आंदोलनात धुडगूस घालणारा अभिनेता दीप सिद्धूला तब्बल 14 दिवसानंतर पोल....

Read more