By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दोडामार्ग - तालुका गोव्यात विलिनीकरणाच्या मुद्द्याबाबत तयार केलेल्या एका व्हॉट्सऍप ग्रुपवर आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात घाणेरडे शब्दवापरुन त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पोस्ट टाकणाऱ्या व त्या ग्रुपच्या सर्व ऍडमिनवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. संबंधित स्क्रीनशॉटच्या प्रती आणि अर्ज देऊन त्यांनी कारवाईची मागणीही केली.
निवडणुकीनंतर तालुका गोव्यात विलिनीकरण करण्याचा विचार पुढे आला आणि काही जणांनी तालुका गोवा विलिनीकरण नावाने काही व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आले. त्यातील एका ग्रुपवर श्री. केसरकर यांची मानहानी करणारी अगदी खालच्या स्तरावरील टीका केली, असे या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमिवर आज येथे बैठकीसाठी आलेले जिल्हाप्रमुख संजय पडते, ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत केसरकर, तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, जिल्हा उपप्रमुख गणेशप्रसादगवस आणि संजय गवस, गोपाळ गवस, नगरसेवक दिवाकर गवस, तुकाराम बर्डे, श्रेयाली गवस, विनिता घाडी, संजना कोरगावकर, संदीप कोरगावकर, दीपाली दळवी, भगवान गवस, सुषमा सावंत, श्रद्धा परब, गिरीश डिचोलकर, दशरथ मोरजकर, दौलत राणे, लवू मिरकर, मदन राणे, शिवराम मोर्लेकर, रोनाल्ड फर्नांडिस, बबलू पांगम आदींनी पोलिस ठाणे गाठत संबंधितांवरकारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी दिलेल्या अर्जात ग्रुप ऍडमिन असलेल्या सर्वांवर तसेच ही पोस्ट टाकणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाथरी शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असताना एका चोरट्यास स्थानिक गुन्ह....
अधिक वाचा