ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

टी.व्ही. अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 25, 2020 03:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टी.व्ही. अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या 

शहर : मुंबई

       मुंबई - मीरा रोड येथे राहणाऱ्या टी. व्ही. अभिनेत्री सेजल शर्मा हिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. येथे त्यांना सेजलाची सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटच्या आधारे पुढील तपास सुरु आहे. "दिल तो हॅपी है जी" या मालिकेतून सेजल शर्मा प्रकाशझोतात आली होती. 


        सेजल शर्माच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळले नाही. मात्र तिच्या खासगी जीवनात असलेल्या काही समस्यांमुळे आलेल्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी मीरा-रोड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सेजल शर्मा उदयपूरची रहिवासी होती. "दिल तो हॅपी है जी" हा तिचा पहिला टी.व्ही. शो होता. त्याआधी तिने अनेक जाहिराती आणि एका वेबसिरीजमध्येही काम केलं होतं. अलीकडेच तिची "दिल तो हॅपी है जी" हि मालिका बंद झाली होती. 


    काही दिवसांपूर्वी टी. व्ही. अभिनेता कुशल पंजाबीने देखील आत्महत्या केली होती. त्याच्याही आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी बांद्रा पोलीस तपास करीत आहेत.   

मागे

कोल्हापुरात २० वर्षीय तरुणीच अपहरण
कोल्हापुरात २० वर्षीय तरुणीच अपहरण

        कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगड परिसरात २० वर्षीय तरू....

अधिक वाचा

पुढे  

ठाण्यात ट्रकने ५ जणांना चिरडले
ठाण्यात ट्रकने ५ जणांना चिरडले

           वसई : ठाण्याहून वसईत जाणार्‍या एका ट्रकने रस्त्यावर झोपलेल....

Read more