By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 06:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : hyderabad
आंध्रप्रदेश - विधानसभेत बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं ‘दिशा विधेयक 2019’ मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकात बलात्कार तसंच सामूहिक बलात्काराच्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असून 21 दिवसात खटला पूर्ण करण्यासंबंधी सांगण्यात आलं आहे. याआधी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने महिला आणि लहान मुलांशी संबंधित गुन्हेगारांना कडक कारवाई करण्यात यावी यासाठी दोन विधेयकं मंजूर केली आहेत.
दिशा विधेयकाला आंध्र प्रदेश गुन्हेगारी (सुधरणा) कायदा 2019 म्हटले आहे. या विधेयकांतर्गत बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या अपराधची सुनावणी त्वरित करत, 21 दिवसांच्या आत निकाल लावण्याची आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने दिशा विधेयक मंजूर केलं होतं. सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार अशा प्रकरणांची सुनावणी चार महिने चालते.
मुंबई - मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणी....
अधिक वाचा