By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 06:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 55 वर्षाच्या डॉक्टरांनी एका 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तपासानंतर आरोपी डॉक्टराला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. पीडित मॉडेल एका मालिकेमध्ये काम करायची. एका ओळखीच्या मित्राकडून तिला डॉक्टरचा पत्ता मिळाला. त्वचेच्या ट्रिटमेंटसाठी मॉडेल डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली. 2017 मध्ये त्यांच्यात मैत्री झाली होती. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यावेळी ती आणि आरोपी डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर डॉक्टरांकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आला. यात आरोपी डॉक्टरविरोधात एका आठवड्या आधी एफआयआर दाखल करण्यात आली होती.
मॉडेल तरुणीसाठी डॉक्टरने वर्सोवामध्ये घर भाड्याने घेतलं होतं. तपासादरम्यान, काही पैसे तरुणीच्या अकाऊंटमधून डॉक्टरला ट्रान्सफर केले असल्याचंही समोर आलं. तर डॉक्टरने तरुणीला ब्लॅकमेल करण्यासाठी तिचे काही फोटो काढले असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली. त्वचेवर ट्रिटमेंट सुरू असताना डॉक्टरने तरुणीचे फोटो काढले. आणि ती पोलिसांत जाऊ नये यासाठी तो तिला ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर डॉक्टरने पीडितेवर बलात्कार केला आणि त्यावेळी तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मागच्या आठवड्यात या प्रकरणासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत डॉक्टरला ताब्यात घेतलं असून 10 मेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
भाजप महापौरांनी शिवसेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ज....
अधिक वाचा