By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2019 07:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्लीत शुक्रवारी रात्री मैत्रिणीकडून हॉस्टेलकडे जात असताना कॅब चालकाने जेएनयूच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा दिल्लीत खळबळ माजली आहे.
जेएनयूमध्ये दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यानंतर हॉस्टेलकडे जाण्यासाठी मंदिर मार्ग येथून पीडित विद्यार्थिनीने कॅब पकडली आणि त्यानंतर नशेचा पदार्थ देऊन कॅब चालकाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कॅब तीन तास फिरवून तिला अर्धवट शुद्धीत असताना दक्षिण दिल्लीतील एका पार्कजवळ रस्त्यावर फेकून दिले. त्यानंतर स्थानिकांनी तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले. उपचारानंतर पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलला गेली आणि तिने हॉस्टेलच्या अधिकृत व्यक्तीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान, याप्रकरणी तिला हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात नेले आणि तक्रार देण्यास सांगितली. पीडित तरुणीचा जबाब नोंदविण्यात आला असून पोलीस आरोपी कॅब चालकाचा शोध घेत आहेत.
अमेरिकेने ठार केलेल्या क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार झाल्या....
अधिक वाचा