ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दारु पिऊन आल्याने घरात न घेतल्याच्या रागत जावयाकडून सासूची हत्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 06:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दारु पिऊन आल्याने घरात न घेतल्याच्या रागत जावयाकडून सासूची हत्या

शहर : पुणे

पुण्यातील पाषाणमधील संजय गांधी वसाहतीत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. दारु पिऊन घरात येऊ न देणार्‍या सासूची जावयाने डोक्यात लोखंडी वार करत हत्या केली. चतुःश्रुंगी पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातल्या वाघमारे वस्तीत 60 वर्षीय सुदामती गायकवाड आणि 45 वर्षीय आरोपी दिगंबर ओव्हाळ राहात होते. दिगंबर ओव्हाळ हा मजुरीचं काम करतो. दिगंबरचं यापूर्वी एक लग्न झालेलं आहे, तर सुदामती गायकवाड यांच्या मुलीसोबत त्याने दुसरं लग्न केलं आहे. सुदामती गायकवाड या वारकरी होत्या, तर दिगंबरला दारुचं व्यसन होतं. त्यामुळे तो जेव्हा दारु पिऊन यायचा, तेव्हा सुदामती त्याला घरात येऊ देत नसत. या कारणावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणंही व्हायची. आज दुपारीही त्यांच्यात जुन्या कारणावरुन वाद झाले. त्यानंतर सुदामने लोखंडी रॉडने सासू सुदामती गायकवाड यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चतुश्रुंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपी दिगंबरला ताब्यात घेतले असून सुदामती यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली.
 

मागे

धक्कादायक : 55 वर्षाच्या डॉक्टरने केला 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार
धक्कादायक : 55 वर्षाच्या डॉक्टरने केला 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार

मुंबईमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 55 वर्षाच्या डॉ....

अधिक वाचा

पुढे  

परळ हिंदनगर युवकाच्या हत्याने हादरलं, गटारामध्ये सापडला मृतदेह
परळ हिंदनगर युवकाच्या हत्याने हादरलं, गटारामध्ये सापडला मृतदेह

परळी शहरातील हिंदनगर भागात अज्ञात युवकाची हत्या करण्यात आली आहे. सकाळी 5 च्य....

Read more