ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 16, 2019 11:22 AM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रियकराच्या मदतीनं दत्तक मुलीनंच केली आई-वडिलांची हत्या

शहर : नागपूर

नागपूरच्या वृद्ध दाम्पत्याच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झालाय. या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रियंका असं आरोपी मुलीचं तर मोहम्मद इकलाख असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.

आरोपी मुलगी प्रियंका चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी असून ती संगणक अभियंता आहे तर तिचा प्रियकर मोहम्मद इखलाख हा क्रिकेटर असून त्यानं विदर्भ संघातर्फे क्रिकेट सामने खेळले आहेत.

दोघांच्या विवाहाला चंपाती दाम्पत्याचा विरोध असल्यानं स्वतःच्याच आई वडिलांची प्रियकराच्या मदतीनं हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. हत्येपूर्वी दोन्ही आरोपींनी वृद्ध दाम्पत्याला गुंगीचं औषध देऊन अवजड वस्तूनं प्रहार करून खून केला. गुन्हे शाखा पोलीस याबाबतीत अधिक तपास करीत आहेत.

 

मागे

धक्कादायक! लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या
धक्कादायक! लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

वाशिममधील शुक्रवार पेठेत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ ....

अधिक वाचा

पुढे  

विजय मल्या, नीरव मोदीच नाही तर यांच्यासह  36 उद्योगपती देशातून पळून गेले आहेत  - ईडी
विजय मल्या, नीरव मोदीच नाही तर यांच्यासह 36 उद्योगपती देशातून पळून गेले आहेत - ईडी

विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतींनी देशातून पलायन केल्याची मा....

Read more