By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 03:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
चाकणमध्ये महिलेची प्रसुती करताना मुलीच्या अर्भकासह महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन डॉक्टरांवर चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. सपनाच्या मृत्यूनंतर काही काळ नातेवाईक संतप्त झाल्याने काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हॉस्पिटलजवळ पोलीस बंदोबस्त देण्यात आला. ही घटना काल रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. सपना सुधीर पवळे (30) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मयत सपनाचे पती सुधीर मच्छिंद्र पवळे (30) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी चाकण येथील अरगडे हॉस्पिटलचे डॉ. असित अरगडे, क्रिटिकेअर हॉस्पिटलचे डॉ. राजेश घाटकर व डॉ. सुपेकर यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात शु....
अधिक वाचा