ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवालांची हकालपट्टी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 01:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवालांची हकालपट्टी

शहर : delhi

मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांना पदावरून निलंबीत करण्यात आली आहे. नीरव मोदी आर्थिक घोटाळा प्रकरणातील तपास अधिकार्‍यांना योग्य  त्या प्रक्रियेचे पालन न करता कार्यमुक्त करण्याच्या निर्णयामुळे अग्रवाल यांची  पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अग्रवालांचा कार्यकाळ 3 वर्षांनी कमी केला आहे. 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांना गृह विभागात पाठवण्यात आले आहे. मुंबईतील ईडीचा विशेष संचालक हा पश्चिम विभागाचा प्रमुख असतो. महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर त्याचे नियंत्रण असते. मुंबईच्या संचालकांचा कारभार आता चेन्नईतील विशेष संचालकांना सुपूर्द करण्यात आला आहे. अग्रवाल यांना 2017 मध्ये ईडीत प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले होते. 29 मार्च रोजी संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवल्यानंतर अग्रवाल चर्चेत आले होते.

मागे

विजय मल्या, नीरव मोदीच नाही तर यांच्यासह  36 उद्योगपती देशातून पळून गेले आहेत  - ईडी
विजय मल्या, नीरव मोदीच नाही तर यांच्यासह 36 उद्योगपती देशातून पळून गेले आहेत - ईडी

विजय मल्या आणि नीरव मोदीच नव्हे तर 36 उद्योगपतींनी देशातून पलायन केल्याची मा....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई विमानतळावर 35 लाख 85 हजारांचे सोने जप्त
मुंबई विमानतळावर 35 लाख 85 हजारांचे सोने जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 35 लाख 85 हजार रु....

Read more