ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नातीवर बलात्कार करणाऱ्या माजी सैनिकाला २० वर्षे तुरुंगवास

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 04:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नातीवर बलात्कार करणाऱ्या माजी सैनिकाला २० वर्षे तुरुंगवास

शहर : patna

           पाटणा - बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एक निवृत्त सैनिक स्वतःच्या नातीवर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या आईला याबाबत माहीत असूनही तिनं सासऱ्यांना साथ दिली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं ६५ वर्षीय निवृत्त सैनिकाला आणि आरोपी सूनेला २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय न्यायालयानं या दोघांना दंडाची शिक्षाही सुनावली.


           'दोघांनाही तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आणखी तीन महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे,' अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. पीडितेच्या जबाबानुसार, २०११ साली तिचे वडील बेपत्ता झाले. त्यानंतर तिच्या आजीनंही आत्महत्या केली होती.


             'आरोपी लष्करातील निवृत्त सैनिक आहे. आता तो एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. घरातील एकमेव कमावणारी व्यक्ती असल्यानं त्याचा त्यानं गैरफायदा घेतला. पीडित मुलीनं अनेकदा आजोबांची तक्रार आईकडे केली. पण तिनंही आरोपीला साथ दिली, ' अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.'असा' उघडकीस आला. 


           या वर्षी फेब्रुवारीत हा प्रकार उघडकीस आला. पीडितेनं आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांना सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. पीडितेच्या माहितीनुसार, तिचे आजोबा अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होते. लहानपणापासून लैंगिक शोषण केले जात होते. आता पीडिता तिच्या आईच्या कुटुंबीयांसोबत राहते.
 

मागे

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

           चंद्रपूर - राजुरा वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका व्य....

अधिक वाचा

पुढे  

तिला स्वत:च्या भावाशीच करायचं होतं लग्न
तिला स्वत:च्या भावाशीच करायचं होतं लग्न

          दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एका अल्पव....

Read more