ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोळसा खाण घोटाळा: वाजपेयी सरकारमधील मंत्री दिलीप राय दोषी, 14 ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 08:25 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोळसा खाण घोटाळा: वाजपेयी सरकारमधील मंत्री दिलीप राय दोषी, 14 ऑक्टोबरला शिक्षेची सुनावणी

शहर : देश

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोळसा मंत्रीपद भूषवलेल्या दिलीप राय यांना दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दिलीप राय यांच्यासह आणखी 5 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. कोळसा खाण वाटप घोटाळा नियोजित कट असल्याचे न्यायालयाने म्हटले.

आईएएनएसच्या वृत्तानुसार दिलीप रायसह 5 जणांना 1999 च्या 14 व्या स्कीनिंग कमिटीच्या झारखंड मधील गिरीडीह जिल्ह्यातील 105.153 हेक्टर कोळसा खाणपट्ट्याच्या वाटपात घोटाळा झाला. कोळसा मंत्रालयातील दोन माजी वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार बॅनर्जी, नित्यानंद गौतम यांना देखील दोषी ठरवण्यात आले आहे.

कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे पूर्व प्रकल्प मार्गदर्शक आणि निदेशक महेंद्र कुमार अग्रवाल दोषी असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. दिल्लीच्या राऊड एवेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश भरत पाराशर यांनी या प्रकरणी निकाल दिला. दिलीप राय 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कोळसा मंत्री होते.

न्यायालयाने राय यांना 102 ब(गुन्हेगारी कट), 409(गुन्हेगारी फसवणूक), भादवि, 420 (फसवणूक),भ्रष्टाचार विरोधी कायद्यांमधील विविध कलमांन्वये दोषी ठरवण्यात आले. महेश कुमार अग्रवाल आणि कॅस्ट्रॉन माइनिंग लिमिटेड ला 379 (चोरी) आणि भारतीय दंड विधानच्या 34 व्या कलमानुसार गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात 51 साक्षीदारांनी साक्ष नोंदवली.

मागे

हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण, आरोपी-पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल
हाथरस बलात्कार प्रकरणात वेगळे वळण, आरोपी-पीडितेच्या भावात 104 वेळा कॉल

हाथरस बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. पीडितेचा भाऊ आणि मुख्य आरोपी या....

अधिक वाचा

पुढे  

देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार
देश पुन्हा हादरला, 9 नराधमांकडून 3 शहरांत तरुणीवर सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशच्या हाथरस इथं झालेल्या घटनेतून देश अजूनही बाहेर आलेला नाही. अ....

Read more