ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गौरी लंकेश हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गौरी लंकेश हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक 

शहर : ranchi

        रांची - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील मास्टमाईंड ऋषिकेश देवडीकर याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गौरी लंकेश हत्येचा तपास करीत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) झारखंडमधून त्याला ताब्यात घेतले. ऋषिकेश देवडीकरला आज धनबादमधील कोर्टात हजर करण्यात येणार असून कोठडी घेतल्यानंतर बेंगळुरूत त्याची चौकशी केली जाणार आहे.

 
       दरम्यान, ऋषिकेश गेल्या काही दिवसांपासून झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली. ऋषिकेश हा मूळ औरंगाबादचा असून तो वेगवेगळ्या नावाने राहत असल्याची माहिती मिळत आहे. मुरली, शिवा राजेश, भास्कर अशी नावे त्याने बदलल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी झारखंडमधील धनबाद येथे कतरास याठिकाणी छापा टाकून त्याला अटक केली. दरम्यान, गौरी लंकेश हत्येप्रकरणी आतापर्यंत १८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

     प्रसिद्ध कवी आणि पत्रकार पी. लंकेश यांच्या कन्या गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरूत हत्या करण्यात आली होती. तीन हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात गौरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. गौरी या 'लंकेश पत्रिका'च्या संपादिका होत्या.
 

मागे

जेएनयूतील २० विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफ.आय.आर
जेएनयूतील २० विद्यार्थ्यांवर पोलिसांनी दाखल केला एफ.आय.आर

            नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटन....

अधिक वाचा

पुढे  

मुलाने केले आईच्या मृतदेहाचे तीन भागात विभाजन
मुलाने केले आईच्या मृतदेहाचे तीन भागात विभाजन

         मुंबई - कुर्ला परिसरात जन्म दिलेल्या आईची हत्या केल्याचा धक्....

Read more