ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यांवर गुन्हा दाखल

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 28, 2020 02:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यांवर गुन्हा दाखल

शहर : मुंबई

           मुंबई : प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याच आदेशाने दोन तरुणींनी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप एका महिला कोरिओग्राफरने केला आहे. या प्रकारानंतर गणेश आचार्य यांच्यासह तिघांविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ जानेवारीला अंधेरी पश्चिम येथील रहेजा क्लासिकमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. 

           मारहाण झाल्याचा दावा करणार्‍या महिला कोरिओग्राफरचे नाव कुमारी दिव्या कोटीयन असे आहे. किरकोळ कारणावरून आणि गैरसमजातून गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरून जयश्री व प्रिती या दोन तरुणींनी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप कोटीयनने केला आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्यावेळी गणेश आचार्यही तेथे उपस्थित होता, असा दावा तक्रारदार तरुणीने केला आहे. या आरोपाविषयी गणेश आचार्य यांनी अध्यापही मौन पाळलं आहे.

         कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात यापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने तक्रार केली होती. अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरुध्द तनुश्रीने विनयभंगाचा आरोप केला होता, त्यावेळी सह आरोपींमध्ये गणेश आचार्य यांचाही समावेश होता. विख्यात ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान यांच्या सोबतही गणेश आचार्य यांचे काही दिवसांपूर्वी खटके उडाले होते. आचार्य यांनी नवीन डान्सर असोसिएशन सुरू केल्यामुळे सरोज खान यांनी आक्षेप घेतला होता. गणेश आचार्य राजकारण करीत असल्याचा दावा सरोज खान यांनी केला होता.    

मागे

कुख्यात गुंड अरुण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धाव 
कुख्यात गुंड अरुण गवळीची सर्वोच्च न्यायालयात धाव 

         नवी दिल्ली : कुख्यात गुंड अरुण गवळीला सुनावलेली जन्मठेपेची शिक....

अधिक वाचा

पुढे  

बहिणीच्या छेडछाडीला केला विरोध: भावाची हत्या
बहिणीच्या छेडछाडीला केला विरोध: भावाची हत्या

           मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा बहिणीच्या छेडछाडीला विरोध कर....

Read more