By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jaipur
राजस्थानमधील बीकानेर परिसरातील सेरुना गावात राहणार्या शेतकर्या ने मोरांना विष दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी दिनेश कुमार हा आपल्या शेतात पिकांचे नुकसान थांबवण्यासाठी मोरावर विषप्रयोग केल्याने सर्व मोर मृत्यूमुखी पडले. या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार याला अटक करण्यात आली आहे.
२०१३ साली राजस्थानमधील टोंक जिल्ह्यात असाच प्रकार घडला होता, मोरांना विष देण्यात आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
सदर मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाचे सहायक वनसंरक्षण यांनी २३ मोरांचे मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.
बीड - औरंगाबादकडून मुखेडकडे निघालेल्या एसटी बसची बोलेरो पिक....
अधिक वाचा