By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 06:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
सोलापूरमध्ये दृष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत जात आहे. दुष्काळाच्या या दृष्टचक्रात शेतकर्यांचे नाहक बळी जात आहेत. शुभ मुहूर्त म्हणून मानल्या जाणार्या अक्षय तृतीयेच्या दिवशीही एका शेतकर्यानं आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून तुकाराम माने या शेतकर्याने आत्महत्या केली आहे. माने हे मोहोळ तालुक्यातील येनकी गावचे रहिवासी होते. विषारी कीटकनाशक पिऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. या शेतकर्यावर युनियन बँकेचे 12 लाख रूपयांचे कर्ज होते.
दुष्काळात ऊस जळून गेल्यानंतर आता डाळिंबाची बागही जळण्याच्या मार्गावर असल्याने माने यांनी नैराश्य आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. राज्यात मागील काही दिवसांमध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र वाढलं आहे. दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्याचं दिसून येत आहे.
3 ऑक्टोबर 2017 रोजी पहाटेच्या सुमारास ही कळस चोरी झाली होती. एकविरा देवीच्या मं....
अधिक वाचा